Tuesday, 18 June 2024

रोटरी क्लब वारजे यांचे कडून शाळेस अदयावत अशी साऊंड व दोन कपाटे प्राप्त *शैक्षणिक वर्ष सुरू बहुली शाळेचा लोकसहभाग सुरु* *आज दिनांक 19/6/2024 रोजी जि प शाळा बहुली येथे रोटरी क्लब वारजे मार्फत शाळेला २ कपाटे व अद्यावत अशी साऊंड सिस्टीम देण्यात आली प्रसंगी रोटरी क्लब वारजे चे अध्यक्ष व सदस्य श्री नंदकुमार अवचट, श्री राजेंद्र बडगुजर, विजय कुमार स्वामी उपस्थित होते या मान्यवरांच्या स्वागतासाठी सरपंच सौ सायली जोरी, उपसरपंच सौ धनश्री भगत ग्रामपंचायत सदस्य श्री बंडाभाऊ भगत, श्री मोहन गायकवाड, श्री सागर गायकवाड व ग्रामसेविका सौ सावंत शाळा व्य समिती अध्यक्षा सौ दीपाली भगत, उपाध्यक्षा सौ स्वाती गायकवाड , सौ ज्योती शिंदे, सौ पूनम भगत, भाग्यश्री भगत तसेच पोलीस पाटील नवनाथ भगत, ग्रामस्थ निवृत्ती भगत, संजय भगत हे उपस्थित होते*

Monday, 17 June 2024


                                                             नवागतांचे स्वागत -१५ जून.२०२४

                                                                      जि प शाळा बहुली



 

Saturday, 15 June 2024

नवागतांचे स्वागत व पुस्तक वाटप दि १५ जून २०२४



*बहुली दिनांक*.......... शनिवार दि १५ जून २०२४ रोजी जि प शाळा बहुली येथे इ पहिली दाखल झालेल्या एकूण 12 विद्यार्थ्यांचे स्वागत व सर्व इ १ ली ते ८ वी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप करणेत आले प्रसंगी ग्रामस्थ श्री शिवाजी कुलूंज यांच्या बैलगाडी मधून विद्यार्थ्याची मिरवणूक काढणेत आली यांच्या स्वागतासाठी ग्रामपंचायत उपसरपंच सौ धनश्री भगत , विद्यमान सदस्य श्री बंडाभाऊ भगत, शाळा व्य समिती अध्यक्षा सौ दीपाली भगत, उपध्यक्षा सौ स्वाती गायकवाड, व शाळा व सदस्य उपस्थित होते सर्व मूलांना ग्रामस्थ श्री विठ्ठल भगत यांचे कडून सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करणेत आला विशेष बाब म्हणजे शाळेतील पास होऊन गेलेल्या इ १० वी / १२ वी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करणेत आला कार्यकमाचे नियोजन शाळेतील शिक्षक सौ स्वाती मांजरे , श्री सुहास जाधव यांनी केले व तांत्रिक सहाय्य श्री मनोज पांचाळ यांचे होते
*************