शाळेचे अंतरंग

शाळेचेअंतरंग

पुणे जिल्हाच्या पश्चीमेला सिंहगड जवळ निसर्गसानिध्यात बाहुली गावात 

जि.प शाळा बहुली ही ग्रामीण भागातील DIGITAL,ISO मानांकित शाळा आहे.या शाळेत एकूण ९५ मुले शिक्षण घेत आहे शाळा विविध अंतरंगाने सजली आहे.
                             शाळेची सुरुवात ही सुरमयी,मुल्याधिष्टीत परीपाठाने होतो,या वेळीच उपस्थिती घेऊन

 गैरहजर मुलांचा आढावा घेतला जातो.नंतर वेळापत्रकाप्रमाणे कृतीतून  गटपद्धतीनेअध्यापन सुरु होते.

 DIGITAL वेळापत्रकाप्रमाणे digital क्लास असतो.शिक्षक शिष्यवृत्ती विषय नियोजनाप्रमाणे शिकवतात.

 मुले रोज कल्प फलकावर दिलेल्या विषयावर २/३ ओळी लिहितात.

                                                                          सर्व वर्ग सजावट केलेले आहे, परिसर झाडे ,वेली,फुलांनी

 नटलेलाआहे.येणाऱ्या पाहुणे अधिकारी यांचे स्वागत परिसरातील फुलानी होते.परसबागेत

 केळी.दुधीभोपळा.मिरच्या यांचा उपयोग शालेय पोषण आहारात होतो.व गावतीचहा सुद्धा वापरला जातो.

 ओक्शिजन बागेत तुळश ,ओवा इ.आहे.
                                      ग्रामस्थानच्या सहकार्याने अद्यवात solar system आहे.संगणक lab,प्रिंटर उपलब्ध

 आहेत.सुसज्य अशा ५ खोल्या आहेत तसेच सर्व वर्गात SMART TV असून वर्ग निहाय पाठ्यक्रम उपलब्ध

 आहे.   .स्वतंत्र मुख्याध्यापक कार्यालय आहे.स्वतंत्र किचन शेड आहे. पोषण आहार ही येथेच चविष्ट

 शिजवला जातो.
                                            क्रीडा स्पर्धेचे साहित्य उपलब्ध आहे.शाळेला सुसज्य असे ग्रामस्थांच्या

 श्सहकार्याने ग्रंथालय उपलब्ध आहे ,त्या मध्ये बालसाहित्य ,शिक्षकांना उपयोगी पुस्तके उपलब्ध आहेत 

No comments:

Post a Comment

*************