Saturday, 19 April 2025

*अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे मार्फत ग्रंथ भेट*

*बहुली दिनांक*
*शनिवार दि. १९ एप्रिल २०२५ रोजी जि प शाळा बहुली येथे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे तर्फे शाळेतील विद्यार्थ्यांन साठी ग्रंथ भेट उपक्रम हा उपक्रम घेण्यात आला या वेळी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे , तथा या पूर्वी  किशोर मासिकाचे संपादक म्हणून काम पाहिलेले श्री अशोक राजगुरु, या संस्थेचे* *कार्याध्यक्ष व प्रकाशक श्री अनिल कुलकर्णी, श्री संजय ऐलवाड - कोषाध्यक्ष अ . भा . मराठी बालकुमार साहित्य* *संस्था पुणे , तसेच एक आदर्श प्राथमिक शिक्षक व सदस्य अ . भा . मराठी बालकुमार साहित्य संस्था व यंदाचा मराठी बलकुमार साहित्य राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक - श्री सचिन बेंडभर , मा . सरपंच श्री अंकुश कांबळे* , *मा स्विकृत सदस्य पुणे मनपा श्री* *गणपत भगत हे उपस्थित होते*
*श्री सचिन बेंडभर यांनी मुलांना मामा च गाव या विषयी कविता गाऊन जुन्या काळचा व आत्ताचा मामाचा गाव स्पष्ट केला*, *श्री ऐलवाड वाचनाचे महत्व विषद केले, श्री कुलकर्णी यांनी अ . भा मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे कार्य स्पष्ट केले, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राजगुरू  यांनी आयुष्यात पुस्तकांचे महत्व , वाचनाने उच्च पदावर पोहोचलेल्या व्यक्ती यां बद्दल सांगीतले या कार्यक्रमाचे सूत्र संचालन शाळेचे शिक्षक  श्री मनोज पांचाळ यांनी केले व आभार सौ शाळेच्या शिक्षिका सौ स्वाती मांजरे यांनी मांडले*

Monday, 14 April 2025

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हवेली तालुक्यात प्रथम क्रमांक व परस बाग स्पर्धेत हवेली तालुक्यात व्दितिय क्रमांक पारितोषिक

*आज दि ९ एप्रिल २०२५ रोजी आमच्या जि प शाळा बहुली स मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हवेली तालुका प्रथम क्रमांक व परस बाग हवेली तालुक्यातील व्दितिय क्रमांकाचे पारितोषिक वितरण करणेत आले सदर गौरव हा हवेली तालुका गटशिक्षणाधिकारी श्री ज्ञानदेव खोसे , पं समिती हवेली माजी सदस्य श्री कांतिलाल काळोखे , विस्तार अधिकारी श्री भरत इंदलकर , श्री राजेंद जगताप यांचे शुभ हस्ते सन्मान चिन्ह, प्रशस्ती पत्र , व तुकाराम गाथा देऊन  सन्मानीत करणेत आले . प्रसंगी बहुली गावचे ग्रामपंचायत सदस्य श्री  मोहनराव गायकवाड , पोलिस पाटील श्री नवनाथ भगत उपस्थित होते*

Tuesday, 1 April 2025

सन २०२५/२६ मध्ये इ १ ली प्रवेश घेणाऱ्या १२ विद्यार्थ्यांनी आज आनंदाने उपस्थिती लावली

दिनांक - २/४/२०२५
आम्ही जि प शाळा बहुली येथेच प्रवेश घेणार या निर्धाराने बहुली गावातील एकूण 11 मुलांनी सन २०२५ / २६ या शैक्षणिक वर्षातील इ १ ली  प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शाळेत आज उपास्थिती सुरु केली


इ ८ वी सन २०२४/२५ या BATCH चा निरोप समारंभ


इ ८ वी निरोप समारंभ
जि प शाळा बहुली येथे इ आठवी च्या वर्गास पुढील शै वाटचालीस शुभेच्छा देणे साठी व उच्च प्राथमिक शिक्षणाचा औपचारिक समारोप प्रसंगी शाळा व्य समिती अध्यक्षा सौ दिपाली भगत, सदस्या- सौ पूनम भगत, सौ स्वप्नाली कांबळे, भाग्यश्री भगत , सौ वाळूंजकर, माजी उपसरपंच श्री चंद्रकांत किरवे  हे उपस्थित होते, इ ३ ते ७ वी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या इ ८ वी च्या सहकारी बद्दल भावना व्यक्त केल्या , इ ८ वी च्या विद्यार्थ्यांनी या शाळेतील अनुभव मांडले व शाळे प्रती आपण काही देण लागतो म्हणून शाळेला पंखा भेट दिला या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना रुचकर पाव भाजी देण्यात आली


आह दिनांक २६/०३/२०२५  रोजी जि. प. शाळा  बहुली येथे 
 

*************