Saturday, 28 June 2025

पालखी उत्सव २०२५

दिनांक .२८ जून २०२५ रोजी शाळेचा पालखी उत्सव हा उत्सहात साजरा करणेत आला 
गावातील भगतवाडी येथील विठ्ठल मंदिर येथे  पालखी आयोजन करणेत आली या वेळी ग्रामस्थ ,पालक यांनी स्वागत ,खिरापत ,खाऊ वाटप करणेत  आला अबल वृद्ध यांनी विविध खेळ ,फुगडी खेळून सहभाग  घेतला 

.



या वेळी शाळेतील पदवीधर शिक्षक श्री सुहास जाधव ह्यांनी अभंगाचे सादरीकरण केले .



 

Tuesday, 24 June 2025

इ १ ली विद्यार्थ्यांना दप्तर वाटप

*जि प शाळ बहुली नवगतांना विशेष भेट*
*आज दि 24/06/2025 रोजी इ १ ली सर्व मुलांना चांगल्या दर्जाच्या  SCHOOL BAG वाटप मा विद्यमान* *सरपंच सौ धनश्री भगत, व ग्रामपंचायत सदस्य श्री बंडाभाऊ भगत* *यांचेकडून वाटप करणेत आले*
*प्रसंगी गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ धनश्री भगत, श्री बंडाभाऊ भगत , सागर गायकवाड* *व ग्राम पंचायत अधिकारी* *श्रीम . निलिमा सावंत मॅडम*
*विशेष उपस्थिती कुडजे* *गावच्या विदयमान सरपंच सोनवणे व खडकवाडी येथील* *सामाजिक कार्यकत्या श्रीम* . *कानगुडे ह्या उपस्थित होत्या*

Monday, 23 June 2025

रोटरी क्लब शाखा डेक्कन जिमखाना कडून शाळेस हार्मोनियम पेटी भेट

*जि प शाळा बहुली सन २०२५ / २६ शैक्षणिक विकासासाठी मदत सुरु*
आज दि .22/06/2025 रोजी तसेच दोन्ही पालखी चा वैष्णवांचा भक्तिमय वातावरण असताना ROTARY CUB OF PUNE , DECCAN GYMKHANA यांचे कडून मुलांच्या गायन कलेसाठी चांगल्या दर्जाची HARMONIUM पेटी देण्याचा कार्यक्रम PYC DECCAN GYMKHANA येथे पार पडला प्रसंगी डेक्कन जिमखाना रोटरी शाखेचे प्रेसिं डेंट श्री पेंडसे व सेक्रेटरी श्री विभूते, रोटरीयन डॉ फलक इ मान्यवर उपस्थित होते या वेळी आमचे सहकारी श्री सुहास जाधव हे उपस्थित होते

Monday, 16 June 2025

माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी केले नवागतांचे स्वागत दि .१६/१६/२०२५


विशेष भेट व सदिच्छा
आज इ १ ली मुलांचे स्वागतासाठी या विभागाच्या जि प माजी सदस्या सौ अनिताताई इंगळे, व त्रंबक मोकाशी यांनी ही नवागतांना खाऊ वाटप करून , मुसळधार पाऊस असताना ही परस बागेतील कलिंगड हातात उचलून पाहिले , व मुख्यमंत्रि माझी शाळा तालुका स्तर प्रथम क्रमांक व परस बाग व्दितिय क्रमांक बद्दल , तसेच चांगली पटसंख्या व आज च्या उपस्थिती बद्दल कौतूक केले


 


सन २०२५/२६ नवागतांचे स्वागत




दिनांक -१६/६/२०२५
जि प शाळा बहुली येथे इ १ ली च्या वर्गात पहिले पाऊल टाकताना व स्वागत कार्यक्रम
या स्वागत प्रसंगी ग्रामपंचायत चे मा . उपसरपंच तथा विद्यमान सदस्य श्री बंडा भाऊ भगत, श्री सागर गायकवाड शाळा व्य समिती अध्यक्षा .- सौ दिपाली भगत, उपाध्यक्षा - सौ स्वाती गायकवाड , व सदस्या सौ पूनम भगत, भाग्यश्री भगत, श्री चंद्रकांत किरवे अंगणवाडी कार्यकर्त्या सौ . वाळूंजकर पालक उपस्थित होत्या





 

*************