Sunday, 23 October 2022

 दिनांक १ ऑक्टोबर २०२२ रोजी जिप शाळा  बहुलीच्या विद्यार्थी  नवरात्र  निमित्ताने  गावातील देवीच्या मंदिरात दर्शनासाठी 












 जि.प.शाळा बहुली येथे  दिनांक 20 ऑक्टोबर २०२२ रोजी सहशालेय उपक्रम अंतर्गत फुलांची सजावट ,आकाश कंदील तयार करणे ,किल्ले तयार करण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी  घेतला , 

                                                                 या बरोबर दिवाळी निमित्त खास दिवाळी  फिस्ट म्हणून पावभाजी  देण्यात आली सदर खाऊ तयार करणेसाठी शाळा व्यवस्थापन समिती णे सक्रीय सहभाग घेऊन  मुलांचा आनंद द्विगुणीत केला 

Thursday, 22 September 2022

 


दिनांक 22 /9/ 2022 वार गुरुवार रोजी leadership for equity and यांच्या ॲमेझॉन कंपनीचे प्रॉडक्ट मॅनेजर बेंगलोर शाखा यांनी इ ५ वी ते ८ वी . विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
👉 यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स.
👉ॲमेझॉन कंपनी नेमकी कशा पद्धतीने काम करते.
👉 व्यावसायिक संधी कोठे कोठे उपलब्ध आहेत‌.
👉 त्या संधी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय केले पाहिजे.
👉 विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांनी काय करावे.
👉याविषयी विद्यार्थ्यांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.
या ऑनलाईन सेशनसाठी अपूर्वा आपटे मॅडम, तेजस सर यांनी समन्वयाची भूमिका साधली.
*विशेष बाब म्हणजे हे ONLINE सत्र हवेली तालुक्यातील पश्चिम भागात जि प शाळ बहुली येथे विना अडथळा पूर्ण झाले, संबंधित AMAZON कंपनीच्या अधिकारी व LEADER SHIP FOR EQITY यांनी TECHNICAL SUPPORT बद्दल कौतुक केले



Saturday, 17 September 2022

September 17, 2022

राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत विद्यार्थी /पालाक यांनी तयार केलेल्या पाककृती 
दिनांक १७/०९/२०२२

Tuesday, 16 August 2022

 स्वातंत्र्याचा  अमृत महोस्तव प्रसंगी आयोजित स्पर्धेत तालुक स्तरीय यश 
मा.गट शिक्षणाधिकारी पं .स हवेली श्री राजेसाहेब लोंढे व केंद्रप्रमुख श्री चिंतामण अद्वैत यांचे हस्ते  तालुकास्तर द्वितीय  क्रमांक प्राप्त केल्या बद्दल  प्रशस्तिप्रत्रक स्वीकारताना अश्विनी कुलुंज  गट इ ६ ते ८

 स्वातंत्र्याचा अमृत महोस्तव प्रसंगी आयोजित  बिट पातळी स्पर्धेत यश 
अश्विनी कुलुंज -सामान्य ज्ञान सपर्धा प्रथम क्रमांक इ ६ ते ८

गौरी घाटे निबंध स्पर्धा  प्रथम क्रमांक  इ ६ ते ८ 


स्वातंत्र्याचा अमृत महोस्तव निमित्ताने केंद्र स्तरावर प्रथम क्रमांक 



१ अश्विनी कुलुंज - सामान्यज्ञान स्पर्धा  इ ६ ते ८
2 विशाखा  भगत  निबंध स्पर्धा -इ ३ ते ५ 



वेशभूषा -समृद्धी गायकवाड -इ ६ ते ८



प्रष्ण मंजुषा सोहम भगत इ ३ ते ५ 

निबंध सपर्धा - गौरी घाटे  इ ६ ते८ 




Tuesday, 9 August 2022

जि . प.शाळा बहुली येथे  पालखी सो हळा दि ८ जुलै २०२२ 















 मा. शालेय पोषण अधीक्षक सौ अर्चना जाधव यांची  दि .७ जुलै २०२२ रोजी शाळा भेट 




 जि. प. शाळा बहुली येथे दि .2 जुलै २०२२ रोजी  ग्रामस्थ बहुली यांचे वतीने इ १ ली ८ वी विद्यार्थ्यांना  वही वाटप करणेत आले प्रसंगी मा. जिप सदस्या  सौ अनिता ताई  इंगळे ,भगीरथ एजुकेशन व सोशल  ट्रस्ट चे संचालक श्री लक्ष्मन माताळे सरपंच ,उपसरपंच, श्री बबन गायकवाड , माजी सरपंच श्री  दत्ता भगत  इ मान्यवर उपस्थित होते 






 सन २०२२/२३  नाव्ग्तांचे स्वागत व पुस्तक  वाटप 





Friday, 20 May 2022

 जि . प. शाळा बहुली शाळेला ग्रामस्थ बहुली यांजकडून अखंड वीज पुरवठा राहावा म्हनून solar pannel ची भेट

देण्यात आली सदर खर्च २००००० (दोन लाख ) रु करणेत आला या प्रसंगी गावाती श्री बबन पाटील ,गणपत भगत,श्री दत्तात्रय भगत श्री अंकुश कांबळे ,नंदकुमार घाटे ,भरत पाटील ,बंडोबा पिसाळ ,चंद्रकांत किर्वे , सरपंच सौ सारिका रायरीकर, उपसरपंच ,श्री बंडाभाऊ भगत ,श्री मोहन गायकवाड ,सागर गायकवाड ,सौ धनश्री भगत ,सौ सायली जोरी ,यांचे उपस्थितीतव देहू बिट विस्ताराधिकारी श्रीं, रंजना कड यांचे शुभहस्ते उद्घाटन झाले प्रसंगी सांगरूण केंद्राचे केंद्र प्रमुख श्री चिंतामण अद्वैत,सोरतापवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख  श्री भारत इंदलकर ,हे मान्यवर हजार होते विशेष बाब म्हणजे बहुली ग्रामस्थ यांनी सर्व शिक्षकांचा उत्कृष्ट काम म्हणून सत्कार करणेत आला .
 










# शाळापूर्व तयारी मेळावा.# जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बहुली ,ता. हवेली ज...

Saturday, 7 May 2022

 



स्वानंदी शिक्षण कार्य शाळेचे आयोजन जि.प शाळा बहुली येथे दि २६/१०/२०२१ रोजी  करणेत आली होती या वेळी सांगरूण केंद्राचे केंद्रप्रमुख श्री चिंतामण अद्वैत ,सोरतापवाडी केंद्राचे केंद्र प्रमुख श्री भरत इंदलकर  व सर्व शिक्षक उपस्थित होते .


 दिनांक २४ /०८/ २०२१ रोजी शाळेती सर्व विद्ध्यार्थ्याना वही वाटप करणेत आले प्रसंगी खडकवासला ग्रामीण  मतदारसंघाचे  अध्यक्ष श्री त्र्यंबक अन्ना मोकाशी ,बहुली गावच्या सरपंच सौ सारिका रायरीकर, उपसरपंच  श्री बंडाभाऊ भगत , श्री विनोद भगत इ. उपस्थित होते.




 

                                                    उपक्रमशिलतेची कास धरणारी शाळा 



पुणे जिल्ह्याच्या ठिकाणापासून साधारणता 40 किलोमीटर दूर निसर्गाच्या सानिध्यात मुठा नदीच्या खोऱ्यात असलेली एक जिल्हा परिषदेची शाळा.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बहूली काय तिचे देखणे रूप पहातच रहावे व सर्वांनी या आधुनिक युगात अत्यंत ग्रामीण भागात देखील दिमाखात उभी आहे घडविण्याची चिमुकल्या उद्याच्या भावी नागरिकास.

                  पुणे जिल्ह्यातील पहिली ISO मानांकित शाळा, पहिली डिजिटल स्कूल पुणे जिल्ह्याचा मानाचा अध्यक्ष चषक पुरस्कार प्राप्त शाळा, शाळेतील दोन शिक्षकांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त, राष्ट्रीय शाळा सिद्धि प्रकल्पामध्ये ‘अ’ श्रेणी गुणांकन असलेली शाळा, स्वच्छतेच्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शाळा, गुणवत्तेच्या बाबतीत प्रथम क्रमांक, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वजणांनी नावाजलेली ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेची शाळा.

                जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बहूली इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत एकूण 89 विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत आहेत शाळेत एकूण चार शिक्षक कार्यरत असून शाळेचे मुख्याध्यापक श्री किशोर वामन भवाळकर यांनी समर्थपणे शाळेची धुरा सांभाळली आहे शाळेतील सर्व शिक्षक तंत्रस्नेही असून विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होत आहे.

              DIGITAL PLATFORM, ABL अध्यापन पद्धती,ज्ञानरचनावाद अशा विविध अध्यापन पद्धतीचा अत्यंत प्रभावीपणे वापर शाळेमध्ये केला जातो शालेय अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांना सर्वगुणसंपन्न बनवण्यासाठी, सहशालेय उपक्रमांची जाणीवपूर्वक निर्मिती केली जाते . सर्व विद्यार्थ्यांना त्यामध्ये सहभागी करून घेतले जाते शालेय स्वच्छता, वृक्षारोपण, कला कार्यानुभव अंतर्गत विविध उपक्रम ,दरमहा बालसभा आयोजन, क्षेत्रभेटी इत्यादी उपक्रम जाणीवपूर्वक करून घेतले जाते, जेणेकरून श्रमप्रतिष्ठा,सभाधीटपणा, व्यावसायिक कौशल्य यांसारख्या गुणांची जोपासना विद्यार्थ्यांमध्ये व्हावी. त्याचबरोबर गायन , कला याबद्दल देखील मार्गदर्शन शाळेमध्ये केले जाते.

                    सर्व प्रश्नांची उत्तरे देणारी अत्याधुनिक 15 कम्प्युटर सुसज्ज लॅब लॅब शाळेमध्ये उपलब्ध आहे .त्याचा सर्व मुलांना लाभ होतो. लहान वर्गातील मुले कम्प्युटरवर paint च्या माध्यमातून चित्रे काढतात ,नावाच्या slides बनवतात. व मोठ्या वर्गातील मुले आवश्यक  माहिती चे इंटरनेट द्वारे संकलन करतात पीपीटी बनवितात.

शाळेमध्ये एलईडी प्रोजेक्टर त्याचादेखील अध्यापनामध्ये प्रभावी वापर शिक्षकांकडून केला जातो.विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. शंभर टक्के उपस्थिती वर्ग स्पर्धा, स्वच्छ सुंदर वर्ग, विविध प्रकारचे सहशालेय उपक्रम प्रभावीपणे राबविले जातात.विशेष बाब म्हणजे बहुली ग्रामस्थ यांच्या फंडातून शाळेत अविरत वीज पुरवठा राहावा म्हणून २००००० रु देणगीतून सुसज असे solar panel उपलब्ध करून दिले आहे.

                COVID-19 च्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये देखील शाळेने दिशादर्शक अशा पद्धतीने काम केले आहे .शाळेतील शंभर टक्के विद्यार्थी ऑनलाईन अध्यापन प्रक्रिया मध्ये समाविष्ट करून घेतले आहेत. WHATSAPP GROUPS च्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षकांशी जोडले आहेत.

Google meeting, ONLINE TEST, मालिका अशा आधुनिक तंत्रज्ञानाला विद्यार्थ्यांनी सहजपणे आपलेसे करून घेतले आहे. व सर्वांनी शैक्षणिक प्रवाह अखंडितपणे सुरू ठेवला आहे. ही एक प्रकारे शाळेत यशच म्हणावे लागेल.

        गुणवत्तापूर्ण विद्यार्थी व उत्तम नागरिक घडविण्याचा वसा घेऊन काम करणारी ही जिल्हा परिषदेची शाळा भविष्यात देखील तेच काम पुढे निरंतर करीत राहील यात शंका नाही.

       

                    संकलन व लेखन

               श्री सुहास संपत जाधव

                (पदवीधर शिक्षक)

   जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बहुली.


Wednesday, 16 March 2022


  डीसेंबर २०२१ पासून covid-19 प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा शाळा सुरु झाल्याने विद्यार्थी प्रतिक्रिया 

Saturday, 15 January 2022

  जि. प. शाळा बहुली येथे दिनांक १२जानेवारी २०२२ रोजी राष्ट्रमाता  -जिजाऊ  जयंती साजरी करणेत आली या वेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ भाग्यश्री भगत ,उपाध्यक्ष -श्री विठ्ठल भगत , व  सर्व  शाळा .व्य.स. सदस्य उपस्थिती होते.व पालक सभा ही घेणेत आली 




 दिनांक ३ जानेवारी २०२२ सावित्री बाई फुले जयंती  जयंती जि.प.शाळा बहुली येथे साजरी करणेत आली या प्रसंगी 

बहुली गावच्या सरपंच सौ सारिका रायरीकर ,शाळा व्यवस्थापन  समिती अध्यक्षा सौ .भाग्यश्री भगत. पूनम भगत, सौ रसिका दिसले व माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ दीपाली भगत उपस्थित होत्या .



*************