दिवाळी सुट्टी नंतर शाळेच्या पहिल्या दिवशी २९/११/२०२३ रोजी हवेली तालुका गट शिक्षणाधिकारी नीलिमा म्हेत्रे व विस्तार अधिकारी श्री अशोक गोडसे यांची शाळा भेट
जिल्हा परिषद उच्च प्राथ.शाळा बहुली या blog ची निर्मिती शाळेचे मुख्याध्यापक श्री किशोर भवाळकर यांनी केली आहे या blog मध्ये शाळेचे अंतरंग शाळेतील विविध उपक्रम ,शिक्षकांना मार्गदर्शक ठरतील असे विषय,pdf पुस्तके ,शासन निर्णय ,परिपत्रके ,VIDEO, ONLINE चाचण्या,इ.समाविष्ट असेल
Wednesday, 29 November 2023
Sunday, 15 October 2023
आज दि 13/10/2023 रोजी जि प शाळा बहुली येथे शिक्षण आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य यांच्या पत्रा प्रमाणे विद्यार्थी उपस्थिती व गुणवत्ते संदर्भात ORION INNOVATION PRIVATE LIMITED या कंपनी द्वारे इ ७ वी विद्यार्थ्यांना TAB देऊन विज्ञान व गणित विषयाचे प्रत्येकी 15 प्रश्न देऊन तणाव रहित वातावरणात व तंत्र सहाय्याने सर्व 100% विद्यार्थ्यांनी हसत खेळत व नाविन्य पूर्ण पध्दतीने घेतलेल्या परीक्षेचा आनंद घेतला व कॅमेर्या समोर मुलाखत देताना परीक्षेविषयी मते मांडली , या वेळी कंपनी प्रतिनिधी शाळेत उपलब्ध smart tv, विज नसताना उपलब्ध backup मुळे परीक्षा सहज पणे घेता आली असे मत मांडले व विद्यार्थ्यांनी ही कमी वेळेत परीक्षा दिली व विद्यार्थी तंत्रज्ञान चांगल्या प्रकारे हाताळताना दिसले या प्रसंगी केंद्र प्रमुख सौ सुजाता काशिद व मुख्याध्यापक श्री किशोर भवाळकर यांची ही मुलाखत व या बद्दल मत विचारले
Sunday, 1 October 2023
१ तास स्वच्छतेसाठी
Sunday, 17 September 2023
Monday, 21 August 2023
Sunday, 16 July 2023
शुक्रवार दिनांक १४ जुलै २०२३ रोजी जि .प.शाळा बहुली येथे रोटरी क्लब डेक्कन जिमखाना शाखा व जीविका हेल्थ केयर यांच्या संयुक्त विद्यमाने बहुली परिसरातील जांबली ,सांगरून ,मांडवी बु,मांडवी खुर्द खडकवाडी येथील शाळेतील ९ ते १४ वयोगटातील मुलींना cervical cancer (गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये )यासाठी प्रत्येकी १०० रु चे vaccine देण्यात आले एकूण ४००००० रु किमतीचे vaccine देण्यात आले
यावेळी रो. डॉ.उमेश फलक ,(अध्यक्ष ),रो. सरिता गोयंका (सचिव ),रो. केतकी फलक ,जीविका हेल्थ केयर चे इर्शाद तांबोळी हे उपस्थिती होते .
Thursday, 6 July 2023
Wednesday, 28 June 2023
दिनांक २७/६/२०२३ रोजी
महिलांनी/ मातांनी झाशीची राणी , राजमाता जिजाऊ, व सावित्रीबाई होऊन स्वाभिमानाने समाजात राहा हे वाक्य आहे महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ रुपाली निलेश चाकणकर यांचे
जि प शाळा बहुली येथे
एका सांविधानिक पदावर सक्षम पणे कार्य भार संभाळताना महिला सक्षमीकरण अंत र्गत महिलांना / मुलिंना त्यांनी समाजापूढील स्त्री ची आव्हाने इ विषयावर शाळेतील मातांना मुलिंना समुपदेशन केले या प्रसंगी श्री लक्ष्मण राव माताळे, सौ शुभांगी खिरीड, सौ उषा शिंदे, व बहुली गावचे सरपंच / उपसरपंच / सदस्य उपस्थिती होते
शाळा व्य समिती सर्व सदस्य उपस्थित होते
या वेळी कार्यक्रमा साठी माता पालकांची उत्सुर्त उपस्थिती व काटेकोर नियोजन याचे कौतुक केले
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ स्वाती मांजरे यांनी केले व मुख्याध्यापक श्री किशोर भवाळकर यांनी आभार मांडले
तंत्र सहाय्य श्री मनोज पांचाळ यांनी केले
फलक लेखन / सजावट पदवीधर शिक्षक श्री सुहास जाधव यांनी केले